ऋषि पंचमी | Rushipanchami- A Indian Festival ! हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण सण व व्रत आहे. आपल्या पूर्वज सप्तर्षींचे समजाप्रति योगदान आणि कौटुंबिक स्वास्थ्य व शारीरिक पवित्रतेला आठवून हे व्रत साजरे केले जाते. विशेषतः स्त्रियांनी हे व्रत पाळावे असे मानले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ऋषि पंचमी म्हणून साजरे केले जाते.
ऋषि पंचमीचे महत्त्व A Indian Festival !
या दिवशी सप्तऋषींची म्हणजेच कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि, आणि वसिष्ठ यांची पूजा केली जाते. या पूजेमुळे आध्यात्मिक आणि मानसिक शुद्धी मिळते तसेच समजाप्रति आपले असलेले ऋण च्या भावनेस जागृत करण्याचे भावाला या दिवशी उजाळा दिल्या जातो.
हे व्रत विशेषत : स्त्रियांनी पाळावे असे मानले जाते. दैनंदिन कार्य करताना आपले शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि धार्मिक व कौटुंबिक कार्यातील उपवासाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हे व्रत पाळले जाते. आजच्या धावत्या जीवनशैलीत या क्रमाला दुर्लक्षित केले जात आहे .
भविष्यपुराणातील कथा
भविष्यपुराणात ऋषि पंचमीच्या A Indian Festival ! महत्त्वाची एक कथा येते. उत्तक नावाचा एक ब्राह्मण, त्याची पत्नी सुशीला आणि त्यांची विधवा मुलगी यांच्या कथेतून अध्यात्म, आस्था, आणि त्यासाठी पाळलेले नियम यांच्याशी सांगड घालून आध्यात्मिक व कौटुंबिक उन्नतीसाठी शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे.
ऋषि पंचमी व्रताचे नियम
ऋषि पंचमी A Indian Festival ! व्रत साजरे करताना काही नियम पाळले जातात:
- धार्मिक मान्यतेनुसार ऋषि पंचमीच्या दिवशी व्रत करणाऱ्या महिला बैलाच्या सहाय्याने पेरलेले धान्य खात नाहीत.
- दिवसातून एकदा निराहार रहावे .
- आहारात प्रामुख्याने कंद-मुळांचा आहार घेने .
- व्रत साजरे करताना शारीरिक स्वच्छतेस आणि पवित्रतेस कटाक्षाने पाळले जाते.
- व्रताच्या दिवशी ब्रम्हचर्य पाळले जाते.
https://www.youtube.com/watch?v=P6P_qoyIMKo
निष्कर्ष
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक व्रत आणि सण A Indian Festival ! काही ना काही उद्देश्य आणि फायदे विशद करून जातात. ऋषि पंचमी सण साजरा करताना त्यातून समजणारे आणि नियमांमुळे उत्पन्न होणारे उद्देश मोलाचे वाटतात. आपल्या पूर्वजांप्रती आदरभाव, उपवासाचे महत्त्व, आध्यात्मिक आणि कौटुंबिक उन्नतीसाठी आवश्यक असलेली मानसिक आणि शारीरिक स्वच्छता या सर्व गोष्टींना अधोरेखित करणारी आपली पुरातन संस्कृती किती दूरदर्शी आणि वैज्ञानिक होते हे स्पष्ट होते.
What is Rushipanchami?
Rushipanchami is a Indian festival , that celebrated with some objects that with clean body and mind the devotion to God.