Google search engine
HomespiritualNamo Narayani ..! नारायणि नमोस्तुते…!| Namo Narayani ..!

Namo Narayani ..! नारायणि नमोस्तुते…!| Namo Narayani ..!

Namo Narayani या सप्टेंबर महिन्यात शक्तीच्या अनेक रूपाचे दर्शन होत असते यात जेष्ठ गौरी व नवदुर्गा या दोन मातृ रूपाचेही समावेश होतो.
भाद्रपद शुद्ध अष्टमीला जेष्ठ गौरीचे आगमन असते. गणपती बाप्पाच्या स्थापने नंतर जेष्ठ गौरीचे तिन दिवसाचे आगमन असते; गौरी म्हणजे बाप्पांच्या आई. असुरांच्या त्रासातून महिलांच्या सौभाग्याचे रक्षण केल्यानंतर या गौरी पूजनाची सुरुवात झाली. सौभाग्य रक्षण, घरातील सुख – समृद्धी व भरभराटीसाठी जेष्ठ गौरीचे पूजन केले जाते. भारतात विशेष करून महाराष्ट्रात या देवीचे मोठ्या नियमाने व सोवळ्याने पूजन केले जाते.
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी ह्या काळात देवी दुर्गेची उपासना केली जाते. दुर्गा देवीचे नऊ दिवसीय नित्य नेमाने पूजन केल्या जाते. असुरांपासून देव – मानवाच्या कल्याणासाठी देवी दुर्गेचा अवतार झाला. या काळाची आठवण म्हणून नवरात्र साजरी केल्या जाते.

देवी नीज स्वरूप व पूजन  :
जेष्ठ गौरी व नवदुर्गा हे दोन्ही एकाच आत्मज्योतीतून अवतरलेले दोन रूप दोघींनीही समाजाच्या कल्याणासाठी स्वतःचे प्रगटीकरण केले. या दोघीही शरीराने भिन्न पण नीजस्वरूप एकच आत्मरूप प्रकाश पुंज आहे. Namo Narayani त्यांच्या विविध पूजन विधीतूनही त्यांच्या आत्मस्वरूपाचे स्पष्टीकरण होते. दुर्गा देवीची स्थापना यालाच घटस्थापना या नावानेही संबोधल्या जाते. घटस्थापना या शब्दाची फोड घट आणि स्थापना या दोन शब्दांनी होते. हिंदू धर्म मान्यतेनुसार मानवी शरीरासही घटाची उपमा दिली जाते. आपले शरीर हे मातीच्या घटाप्रमाणे आहे. जोपर्यंत भौतिक शरीरात आतील आत्मस्वरूप ज्योत तेवत राहते तो पर्यंत या घटाचे – शरीराचे लाड पुरविले जाते, ज्यादिवशी ही ज्योत विझली तेव्हा या शरीररुपी घटाचे विसर्जन निश्चित असते. देवी पूजेतील घटाला विशेष महत्व असते. या घटाला नवदुर्गारूप मानून त्याचे पूजन केले जाते, त्यामध्ये नऊ दिवस अखंड ज्योत लावून त्याची उपासना केली जाते. भक्त दुर्गा देवीचे स्तुतीसुमने गाऊन घटाभोवती फिरून गरबा नृत्य करतात, असे तिचे मनोरंजन केले जाते. घटाच्या मडक्याला काही छिद्र करून त्यावर रंग रंगोटी केली जाते. आत अखंड दिवा लावून वरून मातीचे झाकण झाकले जाते. यालाच माता दुर्गेचे स्वरूप मानल्या जाते. कलियुगात वावरणा-या आपणा किती भक्तांना ह्या नवरात्रात काय पेहराव घालायचा, दांडिया कोणत्या रंगाने सजवायच्या, कोण कोण नृत्यासाठी सोबत असणार या महत्वाच्या प्रश्नासमोर त्या सुसज्जित घटाला का म्हणून दुर्गा देवी मानायचे हा प्रश्न दुय्यम किंबहुना आवश्यकता नसलेला असतो. विज्ञान युगातील आपण विद्यार्थी गणितात एखादी संख्या शोधण्यासाठी त्याला तात्पुरते “x” मानून त्याचा पाठपुरावा करतो आणि शेवटी त्याची नक्की किमत काढतो. मात्र त्या घटाला का म्हणून त्रिलोक वासिनी देवी दुर्गा मानायचे याचे साधे कोडेही मनाला पडू नये आणि त्याच्या खोलात शिरण्याची आवश्यकताही वाटू नये यापेक्षा मोठे दुर्भाग्य नाही. यावर माझे काही विज्ञान प्रगत बंधू भगिनी म्हणतील की वा-याने दिवा विझू नये म्हणून मडके झाकतात आणि दिवा जळायला प्राणवायू हवे म्हणून मडक्याला छिद्र केली असतात तर त्यात काय विचार करण्यासारखे? तर यावर आपले लक्ष श्री संत तुकाराम महाराजांनी तयार केलेल्या

ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळ्या राणा, पाचाही तत्वाच्या ज्योती …

या रचनेवर करू इच्छितो, ज्यास आपण आरती म्हणून स्वीकारले आहे प्रत्येक घरा – घरात याला गाईली जाते. ही आरती आपण आपल्या मोठ्या नातलगांकडून किंवा “गुगल” बाबा कडूनही मोबाईलवर पाहू व ऐकू शकू. कधी शांत बसून समोर ही आरती ठेवा आणि त्याच्या अर्थाला समजण्याचा प्रयत्न करा आणि आपण ज्या घटा भोवती दुर्गादेवी समजून नाचतोय ते घट आपणास काही सुचवतेय का हा विचार नक्कीच करा. शांतपणे विचार केल्यास नक्कीच त्या आरतीचे देवीच्या घटाशी संबंध दिसेल तेच संबंध त्या घटाचे आपल्या शरीराशी, त्या ज्योतीचे आपल्या आत्म्याशी दिसून येईल. आज ब-याच मंदिरातून नवरात्रात आपल्या नावाने अखंड ज्योत जाळत असतो. आजकाल तर आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण काही पैसे देऊन आपल्या नावाने अखंड ज्योत लावण्याची सुविधाही केलेली असते. ( या पूजा पद्धतीला इथे कोणताच विरोध दर्शवायचा नसून हे प्रतिक ज्या नीज तत्वाला धरून आहेत त्याचीही ओळख आपण करायला हवी हा एक आग्रह आहे. ) जर नऊ दिवस आपल्या नावाने अखंड ज्योत जाळून तसेच त्या प्रकाशित घटाभोवती नृत्य केल्याने आपणास इतकी मानसिक शांती भेटत असेल तर त्या ज्योतीस प्रत्यक्ष अनुभवल्यास आपला किती उद्धार होणार हा साधा विचार सुद्धा खूप आल्हाददायक आहे. Namo Narayani.


निष्कर्ष :

नवरात्रातील सजवलेल्या घटाचे महात्म्य जर का आपण जाणून घेतले तर आपोआपच रामायणातील परमप्रकाश, यजुर्वेदातील भर्गो, गुरुग्रंथसाहिब मधील चांदना, बायबल मधील डिव्हाईन लाईटची उकल आपणास होईल व जगातील द्वैताचे मनात बसलेले आवरण नाहीसे होऊन समाजात शांती नांदेल. या नवरात्रात नक्कीच याचा प्रयत्न आपल्या कडून व्हायला पाहिजे. Namo Narayani .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments